महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 news @10 am: सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी; वाचा एका क्लिकवर.. - सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top 10 news @10 am
सकाळी दहापर्यंतच्या ठळक घडामोडी

By

Published : May 30, 2020, 10:17 AM IST

औरंगाबाद - रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपले सासरे केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी जर आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी रावसाहेब दानवे जबाबदार राहतील, असा इशाराही हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे.

सविस्तर वाचा -'मी आत्महत्या केल्यास रावसाहेब दानवे जबाबदार', जावई हर्षवर्धन जाधव यांचा इशारा

मुंबई -भारताच्या तुलनेत महाराष्ट्राला आज (शुक्रवार) मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, त्यातील सर्वाधीक ७ हजार ३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत.

सविस्तर वाचा -दिलासादायक! बरे झालेल्या रुग्णांचा विक्रम, राज्यात ८ हजार ३८१ रुग्णांना सोडले घरी

कुलगाम (जम्मू) - कुलगाम जिल्ह्यातील वानपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यांच्याविरोधात पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त दल कारवाई करीत आहे.

सविस्तर वाचा -जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक

एक वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवीन सोनेरी अध्याय जोडला गेला. देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती. हा अध्याय रचण्यात तुमची खूप मोठी भूमिका होती. म्हणूनच आजचा हा दिवस तुम्हाला वंदन करण्याची , भारत आणि भारतीय लोकशाही प्रति तुमच्या या निष्ठेला प्रणाम करण्याची माझ्यासाठी संधी आहे.

सविस्तर वाचा -मोदी सरकार २.० : वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी दिला जनतेला विशेष संदेश

हैदराबाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी भाजप पुन्हा सत्तेत आले. मोदी सरकारच्या या दुसऱ्या पर्वाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात भाजपने केलेली काही प्रमुख आश्वासने, आणि सरकारने घेतलेले काही प्रमुख निर्णय...

सविस्तर वाचा -मोदी सरकार २.० : भाजपची काही प्रमुख आश्वासने, अन् निर्णय...

मुंबई -क्रांतीकारी तेलुगु लेखक वरावरा राव यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ८१ वर्षाच्या वरावरा राव यांची प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगातच उपचार सुरु होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

सविस्तर वाचा -तेलुगु लेखक वरावरा राव मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीने अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) ३.१ टक्के नोंदविण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये वार्षिक विकासदर ४.२ टक्के राहिला आहे. हा ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर राहिला आहे.

सविस्तर वाचा -आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ४.२ टक्के विकासदर; गेल्या ११ वर्षातील नीचांक

लाहोर -पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने सोशल मीडियाला रामराम करत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण देताना वकारने त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. वकारच्या अकाऊंटवरून एका अश्लील व्हिडीओला 'लाइक' करण्यात आले होते. त्यानंतर वकारने यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला.

सविस्तर वाचा -वकार युनूसच्या ट्विटरवर अश्लील व्हिडीओ!

मुंबई- ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांनी कही दूर जब दिन ढल जाये, जिंदगी कैसी है पहेली ही गाजलेली गाणी लिहली होती.

सविस्तर वाचा -ज्येष्ठ गीतकार योगेश गौर काळाच्या पडद्याआड; 70च्या दशकातील गाजलेल्या गीतांचे लेखन

'ती सध्या काय करते'..असा प्रश्न तिच्या करोडो चाहत्यांना पडलाच असेल. आम्ही बोलतो आहोत ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबाबत..देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घरून काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव देखील यात सामील झालं आहे.

सविस्तर वाचा -लॉकडाऊनच्या काळात...'दीपिका सध्या काय करते'

ABOUT THE AUTHOR

...view details