मुंबई- राज्यात कोरोनाने महाभयंकर परिस्थिती बनवली असतानाच दुसरीकडे राजकीय भूकंप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (सोमावर) दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर रात्री त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतली.
सविस्तर वाचा -राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?; राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार मातोश्रीवर
मुंबई -सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर सोमवारी त्यांनी मुंबईत उपचारासाठी येण्याकरता एअर ॲम्ब्युलन्सची सोय केली होती. परंतु, या एअर ॲम्ब्युलन्स कंपनीकडून दिरंगाई झाल्याने शेवटी चव्हाण यांनी बाय रोड बारा तास प्रवास करून अखेर मुंबई गाठले.
सविस्तर वाचा -एअर ॲम्ब्युलन्सच्या दिरंगाईमुळे अशोक चव्हाणांनी बाय रोड गाठली मुंबई
मुंबई- कोरोनाने महाराष्ट्रासह मुंबईत मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर वडाळा येथील राम मंदिर येथे साजरा होणारा गणेशोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. आता हा गणेशोत्सव पुढच्या वर्षी माघी गणेश जयंतीला साजरा करण्याचा निर्णय जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला आहे.
सविस्तर वाचा -कोरोनाचा प्रभाव; वडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव रद्द
मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. सोमवारी २,४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात १,१८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
सविस्तर वाचा -राज्यात सोमवारी आढळले कोरोनाचे २,४३६ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ६६७ वर
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करायच्या की नाही? याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ऑनलाईन शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या शाळा ऑनलाईन अभ्यासक्रमानेच (डिजीटल पद्धतीने) सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
सविस्तर वाचा -ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय - वर्षा गायकवाड