मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर शनिवार सायंकाळपर्यंत १७ विमानांतून २४२३ भारतीय नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ९०६ प्रवासी मुंबईतील, ११३९ महाराष्ट्रातील तर इतर राज्यातील ३७८ प्रवासी आहेत.
सविस्तर वाचा -वंदे भारत अभियान : विविध देशांतून मुंबईत परतले २४२३ भारतीय; १,१२८ नागरिक क्वारंटाईन, परदेशी भारतीयांसाठी अधिकाऱ्यांची फौज
मुंबई- योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. या प्रकरणी एटीएसच्या पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. कामरान अमीन खान (25) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा -योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी, आरोपीला मुंबईतून अटक
मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. शनिवारी २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सविस्तर वाचा -राज्यात शनिवारी कोरोनाचे २ हजार ६०८ नवीन रुग्ण, एकूण रुग्ण ४७ हजार १९०
मुंबई -कोरोनाचे संकट डोक्यावर असताना ऐन खरीपाच्या तोंडावर थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 'राज्य शासनाकडून येणे' दाखवून बँकांनी त्यांना खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज द्यावे, असे स्पष्ट आदेश सरकारने जारी केले आहेत.
सविस्तर वाचा -शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा आता राज्य सरकारच्या डोक्यावर, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर
मुंबई -मुंबई शहर व उपनगरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाचे 198 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सविस्तर वाचा -CoronaVirus : मुंबईत 198 कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 583 आयसीयूमध्ये