नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीला शरद पवार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि एमके स्टालिन यांच्यासह इतर अनेक विरोधीपक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी आर्थिक पॅकेजवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, असे त्या म्हणाल्या.
सविस्तर वाचा -'20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा'
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला.
सविस्तर वाचा -राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई -राज्यभरातील व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमबीए-एमएमएस सीईटी या सामायिक प्रवेशाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी ११ वाजता सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.
सविस्तर वाचा -एमबीए सीईटीचा आज निकाल, सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर होणार जाहीर
मुंबई -राज्यात आज २९४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. राज्यात आज ८५७ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा -राज्यात आज सर्वाधिक २९४० रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजारांच्या वर
मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या टाळेबंदीत नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना, मुंबईचे पालकमंत्री तोंड लपवून बसले आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकीकडे विरोधपक्षांच्या हिट लिस्टवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आता त्यांचे पुत्र मुंबई शहराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात येत आहे.
सविस्तर वाचा -संकटकाळात पालकमंत्री कुठे गायब? आदित्य ठाकरेही विरोधकांच्या निशाण्यावर