- मुंबई -आरे येथील मुंबई मेट्रोसाठी प्रस्तावित असलेला मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यास आज ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. त्यावर विधानसभेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
सविस्तर वाचा -आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून!
- मुंबई- राज्यात आज (रविवार) 10 हजार 792 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे तर 309 रुग्णांचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. राज्यात आज 10 हजार 461 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.86 टक्के एवढे झाले आहे. सध्या 2 लाख 21 हजार 174 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा -राज्यात 10 हजार 792 नवे कोरोनाग्रस्त, बाधितांचा आकडा 15 लाख पार
- मुंबई - देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत होते. मात्र, राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत घट तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मागील चार आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता नवीन बाधित रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट तर बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
सविस्तर वाचा -दिलासादायक: नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट, बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ
- पॅरिस - स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचला नमवत फ्रेंच ओपनचे १३वे विजेतेपद पटकावले. २ तास ४० मिनिटे रंगलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने जोकोविचचा ६-०, ६-२, ७-५ असा पराभव केला. या विजयासह नदालने कारकिर्दीचे २०वे ग्रँडस्लॅम विजेतेपदही आपल्या नावावर केले.
सविस्तर वाचा -जोकोविचला नमवत नदाल ठरला फ्रेंच ओपनचा राजा
- अबुधाबी -आयपीएलमध्ये आज दोन मुंबईकर कर्णधारांमध्ये लढत होत आहे. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आणि श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नाणेफेक जिंकलेल्या दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला १६३ धावांचे आव्हान दिले आहे. आज दिल्लीने अंजिक्य रहाणे आणि अॅलेक्स कॅरीला संघात स्थान दिले असून शिमरोन हेटमायर आणि ऋषभ पंतला विश्रांती दिली आहे.
सविस्तर वाचा -MI vs DC LIVE : मुंबईला विजयासाठी ४८ चेंडूत ७३ धावांची गरज
- हिसार (हरियाणा) -तीन ते चार वर्षांपासून पगार न दिल्यामुळे येथील उकलाना मंडीतील त्रिवेणी विहारमध्ये राहणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली. पवन कुमार असे या युवकाचे नाव आहे. त्याने फेसबुक लाईव्ह करत सकाळी चार वाजताच्या सुमारास आत्महत्या केली.