- नवी दिल्ली - कंटेनर पलटल्यामुळे 6 युवकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरोहाच्या मोहम्मदाबादमध्ये ही घटना घडली आहे.
सविस्तर वाचा -अमरोहामध्ये कंटेनर पलटल्यामुळे 6 युवकांचा मृत्यू
- नवी दिल्ली -मालेगाव 2008 बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर आज सोमवारी न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत. बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबर 2020 पासून नियमित सुनावणी सुरू आहे. त्याची दुसरी सुनावणी 19 डिसेंबरला विशेष एनआयए न्यायालयात घेण्यात आली होती. मात्र, सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना आता आज म्हणजेच 4 जानेवरीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
सविस्तर वाचा -हाजीर हो! साध्वी प्रज्ञासिंह आज न्यायालयात हजर होणार
- मुंबई -1993 मध्ये राजधानी मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असेलेल्या रुबीना सुलेमान मेमनला मुंबई उच्च न्यायालयाने 6 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. न्यायाधीश एस एस शिंदे व न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठाने हा पॅरोल मंजूर केला.
सविस्तर वाचा -1993 साखळी बॉम्ब स्फोटातील महिला आरोपीला 6 दिवसांचा पॅरोल; 'हे' आहे कारण
- मुंबई- शहरातील महाकाली गुहेच्या जागेवरून भाजपच्या नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष बहकलेला आहे, त्यांना त्यांच्या जबाबदारी आणि कर्त्यव्या बाबत प्रशिक्षण द्यायला हवे, महाराष्ट्राच्या कोणत्याही विकास कामाला विरोध करण्याचे यांचे धोरण म्हणजे, चहा पेक्षा किटली गरम अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाच्या इतर नेत्यांवर केली आहे.
सविस्तर वाचा -पत्रमहर्षी उचला लेखणी, अन् फाडा गळक्या किटल्यांचा बुरखा - शिवसेना
- सातारा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे आज सकाळी निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर वाचा -काँग्रेसचे माजी मंत्री विलासकाका उंडाळकरांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन
- गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये निर्माणाधीन छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागातील स्मशानभूमीत छत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर निर्माणाधीन छत कोसळून हा अपघात झाला आहे.