- मुंबई - कोरोना विषाणुच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
सविस्तर वाचा -गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय; म्हणाले...
- मुंबई - महाराष्ट्र आणि मुंबई शहरातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस दाहक होत असून, एकूणच आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. कोरोना बळींच्या संख्येत सुद्धा पारदर्शकता नाही. या सर्व बाबींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रातील कोरोना संकटावरून देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'या' समस्यांकडे वेधलं लक्ष
- नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीवरील चीनने केलेला सार्वभौमत्वाचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. चीनचा दावा अतिशोयोक्ती आणि असमर्थनीय असून भारत कधीही मान्य करणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
सविस्तर वाचा -गलवान व्हॅलीवरील चीनचा दावा भारताने पुन्हा एकदा फेटाळला
- नवी दिल्ली - उत्तर कोरियातील हॅकर्सकडून कोरोना संबधीच्या बनावट मेलद्वारे उद्या(रविवार) भारतीयांवर सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे. 21 जूलला सहा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होण्याची शक्यता आहे. भारतासह सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, इंग्लड आणि अमेरिकेत हे हल्ले होण्याची शक्यता झेडडीनेट या संस्थेने वर्तवली आहे.
सविस्तर वाचा -जागते रहो..! बनावट ई-मेल पाठवून उत्तर कोरियाचे हॅकर्स सायबर हल्ला करण्याच्या प्रयत्नात
- तहव्वूर राणाची अटक भारतासाठी महत्त्वाची आहे. डेव्हिड हेडलीने मुंबईतील न्यायालयात राणाविरोधात साक्ष दिली होती. तसेच राणाची अटक ही पाकिस्तानची नाचक्की करणारी बाब आहे, असेही निकम म्हणाले. पाहा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष मुलाखत.
सविस्तर वाचा -तहव्वूर हुसैन राणाच्या अटकेमुळे पाकची नाचक्की ; उज्ज्वल निकम यांची विशेष मुलाखत
- नाशिक- जीवनात संघर्ष असला तर यश तुमच्या हातात असते, हे वाक्य राष्ट्रीय धावपटू असलेल्या दत्ता बोरसे याने खरे करून दाखवले. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी निकालामध्ये दत्ता बोरसेने नायब तहसीलदार होण्याचा मान मिळवला. पेठ या आदिवासी भागातून त्याने आपल्या संघर्षमय जीवनाला सुरुवात केली.