- मुंबई - थोर भारतीय तत्वज्ञ, विद्वान आणि राजकारणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज १३२वी जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ पर्यंत शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ रोजी ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील तिरुत्तानी येथे झाला. त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि उपदेशाचा जगभरात मोठा परिणाम झाला.
सविस्तर वाचा-दिनविशेष : कोरोनाकाळातील 'शिक्षक दिन'
- पालघर -लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. सध्या त्यावर अंमल सुरू असून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या ऑनलाइन शिक्षणाचा फटका अतिदुर्गम, ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना बसल्याचे पाहायला मिळले. तरीही या अडथळ्यांवर मात करत पालघरमध्ये एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.
सविस्तर वाचा-असेही शिक्षक...मोखाड्यातील अतिदुर्गम भागात स्पीकरच्या माध्यमातून भरते बोलकी शाळा
- शिरूर (पुणे) - जीवनाला दिशा देण्यात आणि माणसाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात आहे. विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो भारतात शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली.
सविस्तर वाचा-शिक्षक दिन : कोरोनाच्या संकटातही वाबळेवाडीच्या गुरुजनांचे ज्ञानदान; 'ग्रुप होम स्कूल'चा यशस्वी प्रयोग
- मुंबई- आधी मुंबई पोलीस आणि त्यानंतर थेट मुंबई शहराची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रणौतचा सूर अखेर काहीसा मवाळ झाला आहे. मुंबईबाबत तिने केलेल्या वक्तव्याबाबत टिकेची धनी झालेल्या कंगनाने 'मुंबई ही माझी कर्मभूमी असून मी तिला मैय्या यशोदेप्रमाणे मानते, मात्र माझे या शहरावर किती प्रेम आहे याचे प्रमाण मला इतरांना देण्याची गरज नाही.' असे ट्विट करून सारवासारव तिने करण्याचा प्रयत्न केला आहे.
सविस्तर वाचा-कंगनाचा सूर नरमला, म्हणे 'मुंबई हीच माझी कर्मभूमी तिच माझी यशोदा मैय्या'
- मुंबई -शुक्रवारी कोरोनाचे १९२९ नवे रुग्ण आढळून आले असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २५ पुरुष तर १० महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ५२ हजार २४ वर पोहोचला आहे.