मुंबई- भारताने अवघ्या विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे योग! योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो... पुढील चार तासात अहमदनगरसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे... कोरोना विषाणुच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले... संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी १५ जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार, असे जयंत पाटील यांनी सांगितले, यासह महत्वाच्या टॉप-१० घडामोडी...
- मुंबई- योगाभ्यास हा आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतो. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संतुलित संगम म्हणजेच योग. भारताने अवघ्या विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे योग! योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
सविस्तर वाचा -International Yoga Day २०२० : जाणून घ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी...
- मुंबई-पुढील चार तासात अहमदनगरसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह तीव्र पाऊस पडेल, अशी माहिती कुलाबा प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.
सविस्तर वाचा -पुढील चार तासात मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...
- मुंबई - कोरोना विषाणुच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
सविस्तर वाचा -गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय; म्हणाले...
- सांगली- केवळ जलसंपदा खात्याचे प्रेझेंटेशन आणि आपण काही तर वेगळे करत आहोत, हे दाखवण्याचे काम जलसंपदा मंत्र्यांनी सांगलीत पूरस्थिती बैठक घेऊन केला आहे, असा आरोप करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याचा निषेध नोंदवला आहे. यासोबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूर नियोजन बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे म्हटले आहे. या दरम्यान पडकर आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात तू-तू मै-मै झाली.
सविस्तर वाचा -जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तू-तू-मै-मै
- सांगली- संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी १५ जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वडनेरे समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या उपाय नुसार काम केले जाईल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती आढावा बैठक प्रसंगी बोलत होते.