- मुंबई -विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. विधिमंडळात सहभागी झालेल्या पत्रकार, कर्मचारी व आमदार यांच्या एकूण २२०० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ आमदारांसह ६१ कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
सविस्तर वाचा-विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट..! ७ आमदारांसह ६१ जण कोविड पॉझिटिव्ह
- जळगाव -ज्यांनी ज्यांनी वारंवार माझ्यावर आरोप केले, मला विधानसभेचे तिकीट मिळण्यात अडथळे निर्माण केले, माझ्या मुलीला तिकीट देऊन तिचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विषयीचे सारे पुरावे मी पक्षाकडे दिलेले आहेत. मात्र, निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? पुरावे नेमके कशाचे दिले आहेत, व्हिडिओ कोणाचे आहेत, रेकॉर्डिंग कशाची आहे, याबाबत पक्षाने निदान आम्हाला बोलावून तरी विचारले पाहिजे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का? असा थेट सवाल आता माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला विचारला आहे. खडसेंनी पुन्हा एकदा उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेऊन बंडाचे संकेत दिले आहेत.
सविस्तर वाचा-'माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का?'
- मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू कशामुळे झाला? हे जाणून घेण्यासाठी तसेच त्याच्यावर काही विषप्रयोग झाला होता का? हे पाहण्यासाठी त्याचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहे.सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एनसीबी, सीबीआय आणि ईडी हे विभाग करत आहेत. यातून तपासाचा वेग वाढावा यासाठी एनसीबी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वाचा-सुशांतसिंह प्रकरण : व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार
- मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. एनसीबीने या संदर्भात आणखी एक कारवाई केली आहे. एनसीबीकडून मुंबईत काही ठिकाणी छापे मारण्यात आले. या कारवाईदरम्यान एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल, हस्तगत करण्यात आले आहेत. यासंदर्भात अनुज केशवानी या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अनुज केशवानी याची रवानगी पाच दिवसांच्या एनसीबी कोठडीत केली आहे.
सविस्तर वाचा-ड्रग्ज प्रकरणी अनुज केशवानी याला ५ दिवसांची एनसीबी कोठडी
- मुंबई-बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने स्वतः ड्रग घेत असल्याची कबुली एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती, हे विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाने कंगनाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सविस्तर वाचा-ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने स्वतःहून कंगनाची चौकशी करावी- सचिन सावंत
- मुंबई - मुंबई पोलिसांवर विश्वास नसलेल्या लोकांना व सुरक्षा दिली जात असेल तर, हे देशाचे दुर्दैव आहे. परंतु ज्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, हे सगळे महाराष्ट्रद्रोही आता देशभक्त झाले आहेत, अशी जहाल टीका राज्य मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारवर केली आहे. कंगना ही सध्या भाजपाची पोपट झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.