- मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या निर्देशानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने आज (दि. 30 ऑगस्ट) आपला अहवाल तयार केला. त्या अहवालावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांचे पर्याय आणि त्यासाठी असलेल्या अडचणी काय आहेत. याविषयीचे वास्तव अहवालातून समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. हा अहवाल उद्या (दि. 31 ऑगस्ट) सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच राज्यपालसोबतही याविषयी चर्चा तातडीने केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सविस्तर बातमी वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कुलगुरू समितीची बैठक संपली, उद्या सरकारला सादर करणार अहवाल
- नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी एनईईटी आणि जेईईबद्दल बोलावे अशी लोकांची इच्छा होती. मात्र, त्यांनी 'परीक्षा पे चर्चा' करायची टाळून 'खिलोने पे चर्चा' केली, असा टोमणा राहुल यांनी मारला.
सविस्तर बातमी वाचा -'पंतप्रधानांनी 'परीक्षा पे चर्चा' करायची टाळून केली 'खिलोने पे चर्चा'
- नवी दिल्ली - 'अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम कधीच या कॅरेबियन बेटाचा नागरिक झाला नाही,' असे डोमिनिका सरकारने म्हटले आहे. दाऊद या देशाचा नागरिक असल्याचे किंवा अशा प्रकारचे इतर कोणतेही वृत्त कोणत्या प्रकाशकाने किंवा माध्यमाने दिले असल्याचे ते धादांत खोटे आहे, असे येथील सरकारने म्हटले आहे.
सविस्तर वाचा -दाऊद इब्राहिम आमच्या कॅरेबियन बेटाचा नागरिक नाही - डोमिनिका सरकार
- मुंबई -आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी,अशी ओळख असलेल्या धारावी पुनर्विकासाचे घोंगडे गेली 16 वर्षे भिजत आहे. धारावी पुनर्विकास पुन्हा आणखी काही वर्षे लांबणार आहे. कारण आता या प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेवर आता धारावीकरांनी संताप व्यक्त करत थेट सरकारविरोधात दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीतील सर्व संघटना एकत्र येणार असून, सरकारने त्वरित पुनर्विकास मार्गी लावावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्याचवेळी रस्त्यावरचीही लढाई पुन्हा तीव्र करणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा धारावीकर विरुध्द सरकार असा संघर्ष पहायला मिळणार आहे.
सविस्तर वाचा- पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीकर एकवटले; आता लढणार दुहेरी लढाई
- मुंबई -१४ जूनला सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीप सिंहने भाजपच्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे. संदीप सिंह आणि भाजप यांच्या संबधाबाबत ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर वाचा -सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहने ब्रिफिंग केलेला नेता कोण?; सचिन सावंतांचा भाजपाला सवाल
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. आज रविवारी रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी हे तिघेही सीबीआयसमोर हजर झाले असून गेल्या चार तासाहून अधिक काळ त्यांची चौकशी केली जात आहे.