- नवी दिल्ली -ईशान्येतील विकास प्रकल्पांमध्ये परकीय सत्तांचा हस्तक्षेप भारत मान्य करत नसला तरीही, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर मात्र नवी दिल्लीचा विश्वास होता, असे एका माजी राजनैतिक अधिकाऱयाने सांगितले. ज्या आबे यांनी ईशान्य प्रदेशातील विकास प्रकल्पांमध्ये जपानच्या सहभागाचे नेतृत्व केले, त्यांनी आता आरोग्याच्या कारणांवरून पदाचा राजीनामा देऊ केला आहे.
सविस्तर वाचा -ईशान्येच्या विकासातील जपानच्या भूमिकेसाठी आबेंवर भारताचा विश्वास होता
- नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून भारतवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना, भारतीय कृषी कोष, पोषण महिना, लॉकडाऊन, भारतीय खेळ आदी विषयांवर भाष्य केलं. याआधी त्यांनी 18 ऑगस्टला या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांकडून काही सूचना , कल्पना मागविल्या होत्या. पंतप्रधान मोदींचा आज मन की बात हा 68 वा कार्यक्रम आहे.
सविस्तर वाचा -मन की बात : सप्टेंबर 'पोषण महिना' म्हणून होणार साजरा..
- नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून मागील काही दिवसांपासून 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर' भारत योजनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारच्या या योजना फक्त भपकेबाज असल्याचे म्हणत फटकारले आहे. एकीकडे सरकार लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं म्हणते तर दुसरीकडे त्यांच्यापुढे अडथळे आणते, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. विमानतळावर सेवा देण्यासंबंधीच्या निविदांमध्ये सरकारने बदल केल्यामुळे न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली.
सविस्तर वाचा -'केंद्र सरकारची 'मेक इन इंडिया',आत्मनिर्भर भारत योजना फक्त भपकेबाज'
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. आज रविवारी रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी हे तिघेही सीबीआयसमोर हजर झाले असून गेल्या चार तासाहून अधिक काळ त्यांची चौकशी केली जात आहे.
सविस्तर वाचा -सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू
- जळगाव -विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे ते काहीही निर्थरक वक्तव्य करत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी दुपारी जळगावातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
सविस्तर वाचा -स्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी फडणवीसांची धडपड - गुलाबराव पाटील
- मुंबई -गतवर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.