महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या! - ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 At 11 AM
Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या!

By

Published : Aug 17, 2020, 7:13 AM IST

Updated : Aug 17, 2020, 10:50 PM IST

  • मुंबई - देशाने 26 लाख कोविड रुग्णाचा टप्पा गाठला असताना महाराष्ट्रानेही आज (सोमवार) 6 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आजतागायत २० हजार २६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज सोमवारी दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ८ हजार ४९३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.

सविस्तर वाचा -राज्यात दिवसभरात ८ हजार ४९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ओलांडला 6 लाखांचा टप्पा

  • पुणे - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील नागरिकांमध्येच आता कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे सेरोलॉजिकल सर्वेक्षणातुन समोर आले आहे. इंडियन इनस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे.

सविस्तर वाचा -बापरे.! सुमारे 51 टक्के पुणेकरांना नकळत होऊन गेलाय कोरोना, 'या' सर्वेतून समोर आली बाब

  • पालघर -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलीय केमिकल्स या कंपनीमध्ये आज (सोमवार) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, तीन कामगार गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वाचा -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

  • नवी दिल्ली - ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा -पंडित जसराज यांच्या निधनावर पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह देशातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

  • वॉशिंग्टन : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर वाचा -ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

  • चंद्रपूर -अनिल डोंगरे नामक भाजपच्या पदाधिकाऱ्याने कोरोना दूर व्हावा यासाठी चक्क मंदीरात जाऊन हवन केले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो समाजध्यमात टाकले. त्यात लहान मुलेदेखील दिसत आहेत. याबाबत एका व्यक्तीने आक्षेप घेतला असता डोंगरे महाशयांनी त्याला थेट दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला.

सविस्तर वाचा -परमेश्वरा यांना सद्बुद्धी दे; कोरोना पळविण्यासाठी गर्दी करून हवन, भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप

  • नवी दिल्ली -लडाखमधील तणावांच्या पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये उच्च क्षमतेच्या तोफा तैनात केल्या आहेत. या तोफा 4,600 मीटर उंचीवर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तैनात केल्याने भारताचा बराच भाग त्याच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -लडाख तणाव : चीनने तिबेटमध्ये तैनात केल्या उच्च क्षमतेच्या तोफा

  • नवी दिल्ली -बॉलिवूड दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दुपारी साडेचार वाजता निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. कामत हे लिव्हर सिरोसिस आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेला हरहुन्नरी दिग्दर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा -दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे हैदराबादमध्ये निधन

  • अहमदाबाद-खासगी सावकाराच्या छळवणुकीचा भयंकर प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. शिक्षकाने किडनी विकून खासगी सावकाराचे कर्ज फेडले. तरीही सावकाराने आणखी पैसे मिळण्यासाठी शिक्षकाकडे तगादा लावला. अखेर पीडित शिक्षकाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर सावकार व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. राजाभाई पुरोहित असे पीडित शिक्षकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा -गुजरात: किडनी विकून शिक्षकाने फेडले कर्ज; छळ करणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा दाखल

  • नवी दिल्ली -कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षनेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर सोमवारी जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात दलित आणि महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस नेत्यांनी केला.

सविस्तर वाचा -'उत्तर प्रदेशात जंगलराज': दलित, महिलांवरील अत्याचारामुळे राहुल, प्रियंका गांधी संतप्त

Last Updated : Aug 17, 2020, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details