- मुंबई: जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता. त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला, उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमीपूजन होणार. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिर भूमीपूजनावर व्यक्त केली.
सविस्तर वाचा -'श्रीरामाचा वनवास संपला, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मंगलमय क्षणांपैकी एक उद्याचा क्षण'
- मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी रुग्णांच्या संख्येमध्ये मात्र चढ-उतार होत आहेत. राज्यात बुधवारी आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर ७ हजार ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा -राज्यात एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या
- सांगली - मिरजेच्या ‘मिशन हॉस्पिटल’मधून सकाळपासून एक कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचे समजल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास हा वयोवृध्द कोरोना रुग्ण रुग्णालयाच्या एका खोलीत आढळून आला आणि काही वेळातच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे मिशन हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वाचा -कोरोना रुग्ण पहाटे गायब, सायंकाळी रुग्णालयामध्येच सापडला, पण मृतावस्थेत..!
- मुंबई - सुशांतसिंहच्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणावर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. राज्य सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. परंतु, मी आजही संयम बाळगलाय. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल अशा भ्रमात कोणी राहू नये. असा कडक इशारा देत कॅबीनेट मंत्री व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या सुशांतसिंह प्रकरणात करण्यात येणाऱ्या टिकेवर मौन सोडले.
सविस्तर वाचा -..पण मी संयम बाळगलाय ! सुशांतसिंह प्रकरणी आदित्य ठाकरेंनी अखेर सोडले मौन
- पुणे - वयाच्या तेवीसाव्या वर्षी दृष्टी गेल्यानंतर विपरीत परिस्थितीवर मात करत पुण्याच्या जयंत मंकले या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात 143 वा क्रमांक मिळवत यश प्राप्त केले आहे. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना 'पुना ब्लाइंड असोसिएशन' या अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थेची खूप मदत झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आगामी काळात दिव्यांग व्यक्तींसाठीच्या कार्यात सहभागी होण्यास मला आवडेल, असेही जयंत मंकले याने सांगितले.
सविस्तर वाचा -अंधत्वावर मात; दृष्टीहीन जयंत मंकलेचे UPSC परीक्षेत यश
- बीड-देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेत बीडनेही गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे. मंदार जयंत पत्की या विद्यार्थ्याने युपीएससी परीक्षेत देशामध्ये 22 वा क्रमांक पटकाविला
सविस्तर वाचा -युपीएससीत वयाच्या 23 व्या वर्षी देशात 22 वा क्रमांक; बीडच्या मंदार पत्कीचे यश
- कोलकाता - वर्ष 2019 अखेर 490 वर्षे चाललेल्या जुन्या वादाचा शेवट झाला. अयोध्येमधील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जाईल आणि सुन्नी वक्फ बोर्डाला दुसरी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन दिली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय झाल्यापासून आठ महिने उलटून गेले आहेत. यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे अनेक बदल झाले आहेत. परंतु, राम मंदिर बांधण्याच्या प्रयत्नांना कोणताही ब्रेक लागलेला नाही.
सविस्तर वाचा -'माझ्या भावांचे बलिदान सफल, मी अयोध्येत त्यांचे प्रतिनिधित्व करेन'
- मुंबई- राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.