- मुंबई- एका बाजूला अनलॉक होत असताना राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात आज(शुक्रवार) कोरोनाच्या ५ हजार २४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासह वाचा टॉप टेन बातम्या . . . . .
सविस्तर वाचा - कोरोना अपडेट : शुक्रवारी सर्वाधिक ५०२४ नव्या रुग्णांची नोंद, १७५ जणांचा मृत्यू
- पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील दापचरी येथे आज(शुक्रवार) कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.
सविस्तर वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जण जागीच ठार
- नवी दिल्ली - नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 जुलैपर्यंतची नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाने रद्द केली आहे. मात्र काही ठराविक मार्गांवरील विमान सेवा सुरु ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
सविस्तर वाचा - 15 जुलैपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्द, मोजक्या फ्लाईट सुरु राहण्याचे संकेत
- औरंगाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वच विरोधीपक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मनसेने त्यांच्या राडा स्टाईलमध्ये उपायुक्तांवर खुर्ची उगारत प्रशासनाचा निषेध नोंदवला. मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी महानगरपालिका उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत गैरवर्तन केले. हे प्रकरण चिघळत असल्याचे कळताच पोलिसांनी मध्यस्थी करत दाशरथे यांना दालनाच्या बाहेर नेले. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा - औरंगाबाद पालिका : उपायुक्तांच्या दालनात मनसे जिल्हाध्यक्षांचा राडा
- मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय शिक्षण विभागाने जारी केला नसला तरी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मात्र आज एक नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आली असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना आठवड्यातून 2 वेळा शाळेत हजर राहावे लागणार आहे.
सविस्तर वाचा - शिक्षकांनो, आठवड्यातून 2 वेळा शाळेत हजर रहा; अतिरिक्त शिक्षकांनाही मिळणार काम
- नवी दिल्ली– कोरोनाच्या संकटाने अनिश्चिततेचा सावट असताना अर्थव्यवस्था लवकर सावरण्याची चिन्हे दिसत नाही. अशा स्थितीत सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांचे मते देशात सोन्याचे दर येत्या काही महिन्यात दिवाळीपर्यंत 52 हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती राहिली तर सोने दोन वर्षात प्रति तोळा 65 हजार रुपये होईल, असाही तज्ज्ञांनी अंदाज केला आहे. ऑगस्टच्या सौद्यांसाठी बुधवारी मल्टा कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा दर प्रति तोळा 48,589 रुपये झाला होता. हा आजपर्यंतचा सोन्याचा सर्वाधिक दर राहिला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अजूनही विक्रमी झाले नाहीत. येत्या काही दिवसात सोन्याचे दर विक्रमी होणार आहेत.