महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - Top 10 at 11 AM

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 at 11 AM
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Aug 15, 2020, 11:10 AM IST

  • हैदराबाद -अलिकडच्या काही वर्षात भारत सरकार भारतीय वंशाच्या लोकांनी परदेशात यश मिळवले तर खूप गाजावाजा करते. मग ते कितीही दूर असू देत. म्हणूनच अमेरिकेतल्या राजकारणात उच्च स्थानावर पोचलेल्या, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर सरकार काहीच प्रतिक्रिया देत नाही, याचे आश्चर्य वाटते.

सविस्तर वाचा -'कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे नवी दिल्ली सरकारला काही सोयरसुतक नाही'

  • नवी दिल्ली - आज कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी सातव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रथम सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सविस्तर वाचा -स्वातंत्र्य दिन : कोरोना संकट, कृषी क्षेत्र, नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनवर मोदींचे भाष्य

  • नवी दिल्ली - आज देशभरात ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना त्यांनी कोरोना योद्धांना नमन केले. कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी सेवा परमो धर्म मानून २४ तास काम करत आहेत. तसेच आजचा दिवस हा आपल्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा आणि महापुरुषांचा असल्याचा ते म्हणाले.

सविस्तर वाचा -देशात परकीय गुंतवणुकीत वाढ; पंतप्रधानांनी 'मेक फॉर वर्ल्ड'ची केली घोषणा

  • कोल्हापूर -जमिनीच्या वादातून चार कुटुंबातील सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सतेज पाटीलही कार्यालयात उपस्थित होते.

सविस्तर वाचा -जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबांचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न

  • मुंबई - ‌‌ देश 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कोरोनाचा संसर्ग मात्र वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के आहे.

सविस्तर वाचा -महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; 12 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, 364 जणांचा मृत्यू

  • अहमदनगर - 'भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे भविष्य वर्तवले असले तरी त्यांनी सत्तेचे दिवास्वप्न पाहणे सोडून द्यावे, महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार आहे,' असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे व्यक्त केला.

सविस्तर वाचा -'भाजपने सत्तेचे दिवास्वप्न पाहू नये, सरकार पाच वर्षे टिकणार'

  • अहमदनगर- शरद पवार पार्थ पवारांबद्दल जे बोलले तो आमचा कौटुंबीक विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल इतरांनी बोलून काही फायदा नाही, असे विधान आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये केले. तसेच सध्या पार्थ पवार या महत्वाचा विषय नसून बिहार निवडणुकांची जबाबदारी भाजप कोणावर सोपवतंय हे महत्वाचे आहे, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले.

सविस्तर वाचा -पार्थ हा आमचा कौटुंबीक विषय - आमदार रोहित पवार

  • मुंबई - कॅनडातील टोरांटो शहरात येथील निवासी भारतीय मोठ्या प्रमाणात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्या सर्व निवासी भारतीयांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सविस्तर वाचा -कॅनडास्थित भारतीयांना राज ठाकरेंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

  • पुणे -पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 58 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात पुणे पोलीसातील दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

सविस्तर वाचा -अभिमानास्पद.! उत्कृष्ट सेवेबद्दल पुणे पोलीस दलातील 10 योद्ध्यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक'

  • सिडनी -कोरोना प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाचे १२ खेळाडू यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलिया संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. ४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत उभय संघात तीन सामन्यांची टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -ऑस्ट्रेलियाचे १२ खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

ABOUT THE AUTHOR

...view details