महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2020, 7:02 AM IST

Updated : Aug 24, 2020, 1:00 PM IST

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, मनोरंजन, क्रिडा यांसह कोरोनासंबंधी क्षणाक्षणाची अपडेट वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 1 PM
दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

  • नवी दिल्ली– देशाच्या भूभागावर अतिक्रमण करणाऱ्या चीनला भारताने गर्भित इशारा दिला आहे. चीनच्या घुसखोरीविरोधातील समस्येबाबत दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली तर भारताकडे सैन्यदलाचा पर्याय असल्याचे संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी विधान केले आहे.

सविस्तर वाचा-...तर भारताकडे सैन्याचा पर्याय - बिपीन रावत

  • नागपूर- आज दिल्लीत होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरून मतभेद झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सविस्तर वाचा-सुनिल केदार त्यांच्या मागणीवर ठाम; तर यशोमती ठाकूर यांची राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी

  • हिंगोली - दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढत होत चालली आहे. अशातच हिंगोली तालुक्यातील खेरडा वाडी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत तीन वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गंगाधर कैलास ठोंबरे असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा-लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर सतत तीन वर्ष बलात्कार

  • मुंबई -राज्यातील भाजप नेत्यांना डबेवाल्यांनी त्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. आम्हाला पंतप्रधान निधीतून तरी मदत देण्यास भाग पाडा, असे आवाहनच डबेवाल्यांनी केले आहे. गेली १३० वर्ष मुंबईचे पोट भरणारा डबेवाला आज संकटात आहे. त्याच्या पोटाची चिंता महाराष्ट्र सरकार आणी भाजपने करावी व त्यांना मदत करावी, असे आवाहन भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनने त्यांना मदत करण्याची विनंती भाजप नेत्यांकडे केली आहे.

सविस्तर वाचा-भाजप नेत्यांना डबेवाल्यांची विनंती..पंतप्रधान निधीतून तरी मदत करा

  • पुणे -गणेशोत्सव-२०२० च्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत' वाचकांसाठी अष्टविनायकाची माहिती, अख्यायिका तसेच इतिहास समोर आणत आहे. या भागात पहिला अष्टविनायक म्हणजेच मोरेश्वराचा इतिहास जाणून घ्या या खास रिपोर्टमधून...

सविस्तर वाचा-अष्टविनायक दर्शन : पृथ्वीतलावरील पहिले गणेशाचे मंदिर, जाणून घ्या मोरेश्वराची अख्यायिका

  • नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाल्या नाहीत. ते कोमामध्ये असून सध्या व्हेंटिलेटरसपोर्टवर आहेत, असे लष्कर रुग्णालय प्रशासनाने सोमवारी सकाळी सांगितले.

सविस्तर वाचा-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अद्यापही व्हेंटिलेटरवर

  • जयपूर -बसपा आमदारांच्या विलनीकरणाला आव्हान देणारी मदन दिलावर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. याबाबत न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी आदेश दिले.

सविस्तर वाचा-राजस्थान : बसपा आमदारांच्या विलनीकरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  • नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत राजीना देतील, अशी शक्यता आहे. ही बैठक आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा-काँग्रेसची आज बैठक: सोनिया गांधी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची शक्यता

  • नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ४०८ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख ६ हजार ३४९ वर पोहोचली आहे.

सविस्तर वाचा-गेल्या २४ तासांत देशभरात ६१ हजार ४०८ नवे कोरोना रुग्ण

  • नवी दिल्ली -माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा सुरेश रैनाच्या निवृत्तीमुळे आश्चर्यचकित झाला आहे. १५ ऑगस्टला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ''तू शाहिद आफ्रिदी हो आणि निवृत्तीचा निर्णय मागे घे'', असे आकाश चोप्राने म्हटले आहे. मागील दहा वर्षांत आफ्रिदीने चार वेळा निवृत्ती जाहीर करून नंतर पुनरागमन केल्याचे क्रिकेटविश्वाने अनुभवले होते.

सविस्तर वाचा-''तू आफ्रिदी हो आणि निवृत्ती मागे घे'', आकाश चौप्राचा रैनाला सल्ला

Last Updated : Aug 24, 2020, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details