चंदिगढ - हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने राज्यामध्ये त्रिशंकू परस्थिती निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी जनता जननायक पक्षाने भाजपला पाठिंबा दिला असून मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदाची तर जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्या दुपारी 2:15 मिनिटांनी शपथविधी सोहळा राजभवनात होणार आहे.
भाजप गोपाळ कांडांचा पाठिंबा घेणार नसून 10 जेजेपीचे आमदार आणि सात अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार असल्याचं मनोहर लाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सांगितले. भाजपला स्व:ताचे 40 उमेदवार, 10 जेजेपी आणि सात अपक्ष, एकूण 57 आमदारांचा पाठिंबा आहे.