महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : मृतांचा आकडा वाढून २९० वर; कोलम्बो विमानतळाजवळ आणखी एक बॉम्ब सापडला

कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत. हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट

By

Published : Apr 22, 2019, 7:57 AM IST

Updated : Apr 22, 2019, 8:44 AM IST

नवी दिल्ली - श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये ईस्टर संडेदिवशी साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्वच देशांना हादरा बसला होता. यानंतर आज (सोमवार) सकाळी कोलम्बो विमानतळावर आणखी एक बॉम्ब सापडला. हा बॉम्ब निकामी करण्यात यश आले आहे. या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा वाढून २९० वर पोहेचला आहे. तर, ५०० जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.

मृतांमध्ये ३ भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या मानवीय सहाय्याची तयारी भारताने दर्शवली आहे.


कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी'ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे हे बॉम्बस्फोट झाले. तसेच, किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या कोलम्बोमधील हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले. बचावकार्यास सुरुवात झाली आहे. जखमींना कोलम्बो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटांनंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती.


कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत.
हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

Last Updated : Apr 22, 2019, 8:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details