तिरुअनंतपूरम -चालत्या जीपमधून पडल्यानंतरही केवळ दैव बलवत्तर म्हणून, एका एक वर्षाच्या बाळाचा जीव वाचल्याची घटना केरळमध्ये घडली. इक्कुडी येथे घनदाट जंगलातून जात असताना ही चिमुकली जीपमधून खाली पडली होती. त्यानंतर रांगत जात असताना ती जवळच्या चेक पोस्टवरील पोलिसांना दिसली.
घनदाट जंगलातून रात्री रांगत चालली होती चिमुरडी.. प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. आपल्या आई-वडिलांसह ही चिमुकली जीपमधून जात होती. यावेळी थकव्यामुळे तिच्या आई-वडिलांना झोप लागली. त्यामुळे, आईच्या मांडीवरून ही मुलगी खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर काही किलोमीटरपर्यंत पुढे गेल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली.
इकडे, चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांना जंगलातील रस्त्यावर हे बाळ रांगत असल्याचे दिसून आले. या रस्त्यावर रात्री सहसा हिंस्त्र जनावरे भटकत असतात.
गाडीतून पडल्यामुळे या बाळाला तोंडावर आणि कपाळावर थोड्या जखमा झाल्या होत्या. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. आणि तिथून पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा : आपल्या भाषेचे जतन करण्यासाठी अरुणाचलच्या युवकाने तयार केली वांछो वर्णमाला...
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालेला प्रकार लक्षात येताच बाळाच्या आई-वडिलांनी वेल्लाथूवल पोलीस ठाण्यात धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली. तोपर्यंत पोलिसांना आधीच बाळ मिळाल्याची माहिती मिळाली होती. आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केल्यानंतर रात्री १.३० वाजता बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक के. एस. संतोष यांनी दिली.
हेही वाचा : 'या' कारणाने लँडर विक्रमशी संपर्क तुटला, चांद्रयान-१ च्या संचालकांची मीमांसा