- मुंबई : राज्यात आज १० हजार ४४१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून, आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत.
सविस्तर वाचा :राज्यात १०,४४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर ८,१५७ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
- मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-3 दरम्यान राज्य सरकारांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादता व्यक्ती, माल वाहतूक आणि इतर सेवांना परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्यात आता गणेशोत्सवाचा काळ संपताच ई-पास आणि इतर निर्बंधांसंदर्भात नव्याने विचार केला जाणार आहे. त्यासाठीचे संकेत मुख्य सचिव संजयकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले. ई-पास संदर्भातही सूट दिली जाणार असून त्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा :गणेशोत्सवानंतर ई-पास रद्द होण्याची शक्यता, मुख्य सचिवांनी दिले संकेत
- नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेणार नाही. मात्र, नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सविस्तर वाचा :सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडणार.. पक्ष नेत्यांच्या पत्राला नवीन अध्यक्ष शोधण्याचे उत्तर
- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी एक ट्विट करून त्यांनी हा दावा केला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले आहेत.
सविस्तर वाचा :सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह
- पुणे- अजित पवार यांना दाऊदबाबत विचारणा केली असता, अरे कशाला दाऊद, दाऊद करत बसलात अरे म्हणत दाऊदबाबतचा निर्णय केंद्र सरकार व संबंधित अधिकारी घेतील. त्यामुळे या विषयावर बोलून वाद निर्माण करणार नाही, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावधतेची भूमिका घेतली.
सविस्तर वाचा :'अरे कशाला दाऊद.. दाऊद करत बसलात'
- पुणे :कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरू आहे. पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) व्यक्त केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही केली.