नवी दिल्ली - देशातील गरिबांच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींनी किमान उत्पन्न हमी योजना( न्याय योजना) लागू करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच भारतीय भूभागातून चीनी सैनिक कधी माघारी जातील? याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे...तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले त्यामध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे...यासह महत्वाच्या १० बातम्या...
- नवी दिल्ली - देशातील गरिबांच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींनी किमान उत्पन्न हमी योजना( न्याय योजना) लागू करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच भारतीय भूभागातून चीनी सैनिक कधी माघारी जातील? याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
सविस्तर वाचा -'कोरोना संकटात गरिबांना दिलासा देण्यासाठी 'न्याय' योजना लागू करा'
- मुंबई- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले त्यामध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा -'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवण्याची मागणी मान्य'
- मुंबई- महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे.
सविस्तर वाचा -अनलॉक २.० : सरकारने कंबर कसली; 'या' गोष्टींवर बंदी कायम
- नागपूर- महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला असताना या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली आहे. गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आयुक्त मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -...म्हणून गडकरींनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात केली तक्रार
- मुंबई- राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्त झाले असून त्यांनी राज्याचे नवे सचिव संजीव कुमार यांच्याकडे पदभार सोपवला. कुमार यांनी मेहतांकडून सूत्रे स्वीकारली आहेत. तसेच आता अजोय मेहता हे मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.