महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 5 PM : सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - Top 10 At 5 PM

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

todays-top-ten-news-at-5-pm
सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Aug 11, 2020, 7:38 AM IST

Updated : Aug 11, 2020, 4:59 PM IST

  • मॉस्को - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर प्रभावी लस बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत: ही माहिती दिली. ही लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा-कोरोनावर लस शोधल्याचा रशियाचा दावा, अध्यक्ष पुतिन यांच्या मुलीलाही दिला डोस

  • मुंबई- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शंकरराव गडाख हे नेवासा विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून निवडून आले होते. माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेन, असे यानिमित्ताने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले.

सविस्तर वाचा-जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश, मातोश्रीवर बांधले शिवबंधन

  • सोलापूर -मंगळवेढ्यातील भाळवणी गावात मुलाने प्रेमसंबंधातून मुलीला पळून नेले व लग्न केले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा-मुलाने तरुणीला पळवून नेऊन लग्न केल्याने वडिलांना झाडाला बांधून मारहाण, मंगळवेढ्यातील घटना

  • मुंबई- केंद्र सरकार सांगते सुरू करा, तर राज्य सरकार म्हणते आम्ही नाही सुरू करणार म्हणजे राज्य सरकारला काही वेगळी अक्कल आहे का, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. किती दिवस तुम्ही थांबणार आहात, तुम्ही जिम सुरू करा, बघू पुढचे पुढं, असे आदेशच राज ठाकरे यांनी बॉडी बिल्डिंग असोसिएसनला दिला.

सविस्तर वाचा-'जिम सुरू करा पुढचं पुढं बघू'; राज ठाकरेंचे आदेश

  • हैदराबाद– कोरोनाच्या संकटात देशात सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) विमाधारकांना दिला आहे. एलआयसीने बंद पडलेल्या विमा योजनेचे नुतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली आहे.

सविस्तर वाचा-बंद पडलेल्या एलआयसी पॉलिसीचे 'असे' करा नुतनीकरण

  • नवी दिल्ली - जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेळापत्रक जाहीर झाले आहे. या लीगचे आयोजन यावर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे.

सविस्तर वाचा-सीएसकेने 'या' कारणासाठी सरकारकडे मागितली परवानगी

  • मुंबई - अभिनेत्री भूमी पडणेकरची बहीण अगदी तिच्यासारखी दिसते हे अनेकांना माहिती नसेन. पण जेव्हा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले, तेव्हा अनेकांना असा प्रश्न पडला की या दोघी बहिणी तर नाहीत? त्याचे झाले असे की, भूमीची बहीण समिक्षा हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता.

सविस्तर वाचा-भूमी पेडणेकर आणि बहीण समिक्षा... 'जुळ्या बहिणी?'

  • मुंबई - अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या आठवणींचे पुस्तक लिहून काढले आहे. 'अनफिनिश्ड' असे या पुस्तकाचे शीर्षक असेल. याचे लिखाण तिने पूर्ण केले असून, हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

सविस्तर वाचा-'Unfinished' झालं finished : प्रियंका चोप्राचे पुस्तक लवकरच येणार वाचकांच्या हातात

  • अमरावती (आंध्र प्रदेश) - कडपा जिल्ह्यातील चिन्ना वेंतुर्ला येथे भातशेतीत काम करताना ट्रॅक्टर उलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. चिखलामध्ये रुतलेले ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली असून संजीव कर्णा (३०), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा-विदारक! चिखलात रुतलेले ट्रॅक्टर काढताना शेतकऱ्याचा मृत्यू, बघा दुर्घटनेचा VIDEO

  • मुंबई- वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळीत फ्लॅटचा एक नमुना मार्चमधेच बांधून पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट असतानाही वरळीवासियांना हा नमुना फ्लॅट पाहायचा आहे. त्यामुळेच येथील काही संघटनांनी म्हाडाकडे अक्षरशः तगादा लावला आहे.

सविस्तर वाचा-कोरोनाच्या संकटातही वरळी बीडीडीवासीयांना 'सॅम्पल फ्लॅट' पाहण्याची घाई

Last Updated : Aug 11, 2020, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details