- मुंबई - कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव सहार विमानतळावरील एअर इंडियाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे. केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता.
सविस्तर वाचा -कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबईत दाखल
- मुंबई - नऊ ऑगस्ट १९४२मध्ये चले जावचाा त छोडो आंदोलनाचा पाया रचला गेला, यामुळे इतिहासात हा दिवस क्रांती दिवस म्हणून समजला जातो. याच दिवशी महात्मा गांधींनी अन्य नेत्यांना एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्य समरात सामील होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या दिवसाच्या एक दिवसआधी ८ ऑगस्टला अखिल भारतील काँग्रस समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत भारत छोडोचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
सविस्तर वाचा -विशेष मुलाखत: गांधीजींचा 'चले जाव'चा नारा आणि क्रांतीदिनाची पार्श्वभूमी
- नवी दिल्ली -केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. आज दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर साठे यांना १०० पेक्षा जास्त वैमानिकांनी श्रद्धांजली वाहिली.
सविस्तर वाचा -दीपक साठे यांना वैमानिकांनी दिल्ली विमानतळावर वाहिली श्रद्धांजली
- मुंबई - कोविड टेस्ट करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या पॅथॉलॉजी लॅबच उद्घाटन नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून कोविड टास्क फोर्समधील काही मान्यवर डॉक्टरांनी कोविड चाचणीसह उपचारासाठी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करता येऊ शकतो का? याची चाचपणी करायची विनंती राज्य शासनाला केली होती.
सविस्तर वाचा -कोविड टेस्ट करण्यासाठी आता होणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
- मुंबई- देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात येत नसताना या विषाणूमुळे कोरोना योध्यांनाही जीव गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 196 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब धक्कादायक आणि चिंताजनक आहे.
सविस्तर वाचा -धक्कादायक..! आयएमएच्या 196 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
- जळगाव - मराठी अस्मितेसंदर्भात कर्नाटक सरकारची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आपली पातळी सिद्ध केली आहे.