महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्यासह देशभरातील रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर..

todays-top-ten-news-at-11-pm
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jul 28, 2020, 9:49 AM IST

Updated : Jul 28, 2020, 10:53 PM IST

  • मुंबई - वाढत्या कोरोना संसर्गमध्ये राज्याला आज पुन्हा एकदा दिलासादायक बातमी मिळाली आहे. राज्यात आज १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

सविस्तर वाचा :राज्यात आज १० हजार ३३३ रुग्णांना डिस्चार्ज, सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

  • मुंबई - मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईतील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. याचा अर्थ या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याची त्यांना माहितीच नव्हती, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा :झोपडपट्टीतील ५७, इतर विभागातील १६ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या अँटीबॉडीज तयार

  • मुंबई :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना सोबत आल्यास सरकार बनवण्यासाठी भाजपचा कोणताही विरोध नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र सध्या तरी याबाबत शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव नाही, किंवा शिवसेनेकडूनही याबाबतची कोणतीही चर्चा नसल्याचे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या वक्तव्याची हवा काढली आहे.

सविस्तर वाचा :शिवसेनेशी युतीचा कोणताही प्रस्ताव नाही; फडणवीसांनी पाटलांच्या वक्तव्यांची काढली हवा..

  • नवी दिल्ली : जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतात असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. उद्याच्या (बुधवार) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये देशातील वाघांबाबत आकडेवारी जाहीर केली. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. देशाला या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच, देशात ३० हजारांहून अधिक हत्ती, तीन हजार एकशिंगी गेंडे आणि ५००हून अधिक सिंह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा :जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के भारतात; केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकरांची माहिती..

  • लखनऊ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, देशातील नागरिकांनाही या सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राम जन्मभूमीर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा :राम मंदिराच्या भूमीपूजनाचे दूरदर्शनवर होणार थेट प्रक्षेपण; ट्रस्टची माहिती..

  • पुणे :आईकडून बाळाला कोरोना झाल्याची पहिलीच घटना आज पुण्यात नोंदवण्यात आली. ससून रुग्णालयात प्रसूती झालेल्या या बाळाला नाळेतूनच कोरोनाची बाधा झाली होती.

सविस्तर वाचा :पुण्यात प्रसूतीपूर्वीच बाळाला कोरोनाची लागण; देशातील पहिलीच घटना..

  • मुंबई - देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असतानाच येत्या ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण पाहता पावासाळी अधिवेशन ७ सप्टेंबर पासून घेण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीत घेण्यात आला.

सविस्तर वाचा :पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढं ढकललं.. तीन ऑगस्टला होणारं पावसाळी अधिवेशन आता 'या' तारखेपासून होणार सुरू

  • मुंबई - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या(बुधवार) दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा -प्रतीक्षा संपली.. उद्या दुपारी जाहीर होणार दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल

  • नवी दिल्ली -राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला प्रस्तावित आहे. अयोध्येत या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. जैश- ए- मोहम्मद आणि लष्कर- ए-तोयबा या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंंत्रणांनी दिली आहे.

सविस्तर वाचा :राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; पाकिस्ताननं आखला कट...

  • मुंबई – अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी पाटणा पोलिसांनी चार पोलीस अधिकारी पाठविले आहेत. मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत होणाऱ्या तपासाबाबत पाटणा पोलीस असमाधानी आहेत.

सविस्तर वाचा :अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरण : तपासासाठी बिहारचे चार पोलीस अधिकारी मुंबईत होणार दाखल

Last Updated : Jul 28, 2020, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details