मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना देखरेखीसाठी आयसोलशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवरून तब्येतीची अपडेट माहिती दिली जाणार असल्याचे नानावटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात नानावटी रुग्णालयाबाहेरून 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...
वाचा सविस्तर -बच्चन पिता पुत्रांना कोरोनाची बाधा; प्रकृती स्थिर
हैदराबाद - कोरोनाचा अधिक संसर्ग टाळण्यासाठी मृतदेहाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा नियम आहे. मात्र, तेलंगणाच्या निजामाबाद शहरात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर प्रकाश टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटोरिक्षातून नेण्यात आला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा सविस्तर -अतिशय गंभीर... तेलंगणामध्ये कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची हेळसांड
मुंबई -महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. यानंतर आज (रविवारी) सॅनिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या जलसा या बंगल्यावर महानगरपालिकेची टीम दाखल झाली आहे.
वाचा सविस्तर -बच्चन पिता पुत्र कोरोना पॉझिटिव्ह; सॅनिटायझेशन करण्यासाठी 'जलसा'वर पालिकेची टीम दाखल
मुंबई-भारताची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू अशा किंवा डॉ. मनमोहन सिंगांसारखे लोक आहेत, त्यांच्याशी बोलले पाहिजे, असे पवार यांनी म्हटले.
वाचा सविस्तर -मोदींनी अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी जाणकारांची मदत घेण्याची गरज- शरद पवार
जयपूर (राजस्थान) -टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ अॅप भारतात प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, माहिती सुरक्षेच्या कारणास्तव चिनी बनावटीच्या या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉकमधील व्हिडिओमुळे काहींच्या चेहऱ्यावर जरी हसू येत असले तरी बंदी घालण्यात आल्यानंतर सायबर गुन्हेगारांसाठी हे एक नवे शस्त्र सापडले आहे.
वाचा सविस्तर -सावधान...बनावट लिंकवरून 'टिकटॉक' डाऊनलोड करु नका, हॅकर्सच्या जाळ्यात अडकाल