महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक 2019 : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, ८ राज्यात रविवारी मतदान

शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सोडून ७ राज्यांमध्ये १७ मे रोजी संध्याकाळ पर्यंत प्रचार होणार आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : May 17, 2019, 8:49 AM IST

Updated : May 17, 2019, 10:29 AM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने प्रचारावर एक दिवस आधी म्हणजेच १६ मे रोजी बंदी घातली. त्यामुळे पश्चिम बंगाल सोडून ८ राज्यांमध्ये १७ मे रोजी संध्याकाळपर्यंतच प्रचार सुरू राहील.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील ९ जागांवर मतदान होणार आहेत. बंगालमधील कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर, डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर या ९ ठिकाणी येत्या १९ मे रोजी मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तास आधी म्हणजे १७ मे रोजी हा प्रचार सायंकाळी बंद होणार होता. मात्र, येथील प्रचार १६ मेच्या रात्री १० वाजल्यापासूनच बंद करण्याचा आदेश आयोगाने दिला. या निर्णयामुळे विरोधी पक्षांनी आयोगावर टीका केली.

Last Updated : May 17, 2019, 10:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details