मेष- आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री व पाण्यापासून जपून राहावे लागेल.
वृषभ- आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोट्या प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणास यश व किर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क-आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. शक्यतो प्रवास व नवीन कार्याचा आरंभ टाळावा.
सिंह- आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई-वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशयापासून जपा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका.
कन्या- आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल.