मेष- आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्यांकडून लाभ होईल व त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्या संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास - पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.
वृषभ- आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन व मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
मिथुन- आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद - विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.
कर्क-आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत.
सिंह-आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक व सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.
कन्या- आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार - व्यवसायात प्रतिस्पर्धी व विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्या कडून चांगल्या बातम्या समजतील.