मेष -आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
वृषभ -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण मात्र वाढेल. विनाकारण संताप व्यक्त केल्यास आपले काम बिघडण्याची शक्यता आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कर्क -आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता व उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल किंवा अबोला धरला जाईल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावा.
सिंह -आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.
कन्या -आज कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.