मेष -आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानी वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्यांसाठी लाभदायी आहे.
वृषभ -आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.
मिथुन -आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थते मुळे उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे.
कर्क- आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशया पासून दूर राहावे.
सिंह- आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील.
कन्या -कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात - निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल. परंतु वाद - विवाद, चर्चा ह्यात उग्रता दाखवू नका.