कोटा- राजस्थानातील कोटा येथे विविध अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी बिहारमधील विद्यार्थी राहत होते. या विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये परतण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. त्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते. मात्र आता राजस्थान आणि बिहार सरकार यांच्यात झालेल्या सहमतीनुसार विद्यार्थ्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटा येथून बेगूसराय आणि गया येथे दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बिहारला जाणारी विद्यार्थ्यांची पहिली रेल्वे रविवारी सकाळी 11 वाजता सोडण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी विजय प्रकाश यांनी दिली. ही रेल्वे सोमवारी 5.30 वाजता बेगूसरायला पोहोचणार आहे. बंका, बेगूसराय, भागलपुर, जमुई, खगरिया, लखीसराय, मुंगेर आणि शेखपुरा येथील विद्यार्थी या रेल्वेतून प्रवास करणार आहेत.