महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा आज 73 वा वाढदिवस

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. लालू प्रसाद यादव यांचा वाढदिवस गरीब सम्मान दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे तेजस्विनी यादव यांनी सांगतिले.

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव

By

Published : Jun 11, 2020, 10:03 AM IST

पाटणा -राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. राजदचे सर्वेसर्वा आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले लालू यादव सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी रुग्णालयात जाऊन लालू यांची भेट घेतली आणि केक कापून जन्मदिन साजरा केला.

आज लालू प्रसाद यादव यांचा वाढदिवस 'गरीब सम्मान' दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे तेजस्विनी यादव यांनी सांगतिले. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही ट्विटरद्वारे लालूंना शुभेच्छा दिल्या. 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक क्षणी देवाची कृपा तुमच्यावर असो. षड्यंत्रकारांनी कट रचून श्रीकृष्णालाही तुरुंगात पाठवले होते. आपण निरोगी रहावे आणि गरिबांच्या सन्मान आणि हक्कांसाठी संघर्ष करत रहावे. ही प्रार्थना आहे, असे टि्वट राबडी देवी यांनी केले आहे.

1990 ते 1997 पर्यंत लालू यादव बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2004 ते 2009 पर्यंत त्यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभारही स्वीकारला. 15 व्या लोकसभेच्या वेळी ते सारणचे खासदार होते.

1997 मध्ये जेव्हा केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्या विरोधात चारा घोटाळा प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हा लालू यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी आपली पत्नी राबडी देवी यांच्याकडे सत्ता सोपविली आणि ते आरजेडीचे अध्यक्ष झाले. लालू यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात तुरूंगात जावे लागले आणि ते कित्येक महिन्यापासून तुरूंगात राहिले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत लालूंचा पक्ष आरजेडीला एकही जागा मिळाली नव्हती. पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली गेली. लालूंच्या तीन दशकांच्या राजकारणात पहिल्यांदाच त्यांच्या पक्षाला असा पराभव पत्करावा लागला. ज्यात पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही.

काही महिन्यांपूर्वी ज्याप्रकारे महागठबंधनने झारखंडमध्ये भाजपला पराभूत करून सत्ता प्राप्त केली. महायुतीत एकजूट ठेवण्यात हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाशिवाय राजद सुप्रीमो लालू यादव यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेत नितीन कुमार यांची कसोटी असेल. बिहारमध्ये 244 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात मागच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2015 मध्ये झाल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details