नवी दिल्ली- देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. तरीही देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्यावर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात ही रुग्णसंख्या ८ हजार ५९० झाली आहे. तसेच देशभरात कोरोनामुळे ८०० जणांचा मृत्यू झाला आहे.
- औरंगाबाद - कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 83 वर
- मुंबई -आज (सोमवारी) राज्यात 522 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
- कर्नाटक - आज १३ रुग्ण कोरोनामुक्त
- गुजरात - गेल्या २४ तासांत २४७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ५४८ वर पोहोचला आहे. यामध्ये ३९४ डिस्चार्ज, तर १६२ मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे.
- विद्यापीठांच्या परीक्षांबाबत आज विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यामध्ये तज्ज्ञ समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. तसेच सदस्यांनी काही सूचना देखील केल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून आयोगाद्वारे विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सांगण्यात आले.
- यवतमाळ- दिवसभरात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे, तर आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण आहेत.
- मुंबई - वांद्रे परिसरातून 10 इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी मंगळवारी (२८ एप्रिल) संपणार आहे. यामध्ये 6 महिलांचा समावेश असून ते दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झाले होते.
- मुंबई - धारावीमध्ये आणखी १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८८ वर पोहोचला आहे.
- औरंगाबाद- शहरात आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १६ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलगा आणि ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ वर पोहोचली आहे.
- सोलापूर - शहरात 4 डॉक्टर आणि एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
- देशात १ हजार ४६३ कोरोनाचे नवीन रुग्ण, तर ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
- देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ३३० वर पोहोचली आहे. यामध्ये २१ हजार १३२ जणांवर उपचार सुरू आहे, ६३६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर ८८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
- मुंबई - कोरोनाचा संसर्गामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातील शिवाजी सोनावणे (56) या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे.
- मध्यप्रदेश - राजस्थानमधील कोटा येथून २८ विद्यार्थी बसने छत्तीसगडला जात असताना अपघात झाला. यामध्ये एक विद्यार्थिनी जखमी झाली असून सर्व सुखरूप आहेत.
- रॅपिड टेस्टींग किटचा वापर तत्काळ थांबवावा - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
- देशभरात आज १ हजार ३९६ जणांना कोरोनाची लागण
- पुण्यात कोरोनाचे रुग्ण ७ दिवसांत दुप्पट
- झोपडपट्टी परिसरात संस्थात्मक अलगीकरण गरजेचे - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- देशातील १६ जिल्ह्यात २८ दिवसांत नवीन रुग्ण नाही. यामध्ये महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.
- कोरोना रुग्णांशी भेदभाव करणे चुकीचे
- भंडारा - येथे पहिला कोरोना रुग्ण आढळला. एका 45 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे जिल्ह्यधिकाऱ्यांनी सांगितले. गराडा आणि मेंढे या गावाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले.
- मुंबईमध्ये कोरोनाबाधितांवर प्लाझमा थेरपीला सुरुवात -
- लीलावती रुग्णालय - एका रुग्णावर उपचार
- सायन रुग्णालय - दोन रुग्णांवर उपचार
- सेव्हन हिल रुग्णालय - ३ रुग्णांवर उपचार