मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत.जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथील खुलचोहर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. कोरोनासंबंधी देशात विविध घडामोडी सुरु आहेत. तसेच नेपाळच्या पंतप्रधानाने आमचे सरकार उलथून लावण्यासाठी दिल्लीत बैठका सुरू असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी नाही तर आकड्याशी लढतेय, असा घाणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केला आहे. यासह राज्य, देश-विदेशातील महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली त्यापाठोपाठ आणखी 2 वाहने येऊन धडकली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सविस्तर वाचा -मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) -जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील खुलचोहर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या परिसरात संयुक्तपणे शोधमोहीम सुरू आहे.
सविस्तर वाचा -जम्मू काश्मीर : चकमकीत सुरक्षा दलातील जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवलेला आहे. अशा परिस्थितीतही चीनकडून लद्दाख येथे निर्माण करण्यात आलेल्या तणावपुर्ण परिस्थितीनंतर या देशाच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा उघड झाल्या आहेत. परिणामी, अमेरिका आणि रशियासारख्या प्रमुख देशांबरोबर भारताच्या संरक्षण संबंधांना प्रथमच मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
सविस्तर वाचा -चीनबरोबर तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताचे अमेरिका, रशियाबरोबरचे संरक्षण संबंध प्रकाशझोतात
हैदराबाद - कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक 19 हजार 906 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 28 हजार 859 वर पोहोचली आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 3 हजार 51 वर पोहोचली आहे. तर 3 लाख 9 हजार 713 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच 16 हजार 95 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिली.
सविस्तर वाचा -देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी
मुंबई -कोरोना विषाणूवर मात करताना राज्य सरकारकडून चुका होत आहेत. चाचणी कमी करून ही लढाई कधीही जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. मी टीका करीत नाही तर केवळ सूचना करतो आहे. मात्र, सध्या राज्य सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढते आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. या सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, विनोद तावडे, राज्यसभा खासदार नारायण राणे आदी उपस्थित होते.