महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'द ग्रेट खली' दिसला प्रचार रॅलीत; तृणमूलची निवडणूक आयोगाकडे तक्रार - The Great Khali

खली प्रचारात सहभागी झाल्याने त्याच्या विरोधात तृणमुल काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

भोपाळ

By

Published : Apr 28, 2019, 12:07 PM IST

भोपाळ - डब्लूडब्लूईमधील प्रसिद्ध भारतीय रेसलर 'द ग्रेट खली' लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसून आला. २६ एप्रिल रोजी मध्यप्रदेशच्या जाधवपूर मतदारसंघात भाजप उमेदवार अनुपम हाजरा यांच्या प्रचारात तो सहभागी झाला होता. मात्र, प्रचार केल्याने त्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

खली प्रचारात सहभागी झाल्याने त्याच्या विरोधात तृणमुल काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. खलीने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे एकादा विदेशी नागरिक येथील मतदारांच्या मनावर प्रभाव पाडू शकत नाही, असे तृणमुलचे म्हणने आहे. याविषयी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे.

द ग्रेट खली

डब्लूडब्लूईमध्ये द खली हा भारतीय रेसलर म्हणून ओळखला जातो. उंचच्या-उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे अनेक रेसलरांना तो धडकी भरवतो. डब्लूडब्लूईतील सुपरस्टार अंडरटेकरला चितपट केल्याने खली प्रकाशझोतात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details