कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. आज आमदार शिलभद्र दत्त यांनीही तृणमूलला रामराम ठोकला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी तृणमूल काँग्रेसेचे वरिष्ठ नेते दीप्तांग्शु चौधरी यांनीही दक्षिण बंगाल राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
तृणमूल काँग्रेसला गळती लागली असून अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम करत आहेत. हे नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बुधवारी तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे.
भाजपाचा दावा खरा ठरतोय ?