कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडल्याची घटना आसनसोल येथे घडली आहे. भाजप कार्यकर्ते महापालिकेसमोर आंदोलन करताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांची झडप झाली. दोन्ही गटांना शांत करण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केला. याप्रकरणी पोलिसांनी १३ भाजप कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
बंगाल हिंसाचार : तृणमूलच्या नेत्याने केंद्रीय मंत्र्याला म्हटले 'माकड' - केंद्रीय मंत्री
बाबुल सुप्रियो, तुम्ही भाजपचे माकड असाल तर आसनसोल येथे तुम्हांला बंद करण्यासाठी आमच्याकडे पिंजरा आहे, असे वक्तव्य जे. तिवारी यांनी केले आहे.
तृणमूल नेता जे. तिवारी
दोन्ही गटात झालेल्या हिंसाचारावर बोलताना आसनसोलचे महापौर जे. तिवारी म्हणाले, भाजप कार्यकर्ते हल्ला करण्याच्या तयारीनेच आले होते. परंतु, त्यांना महापालिकेच्या गेटलाही स्पर्श करता आला नाही. बाबुल सुप्रियो, तुम्ही भाजपचे माकड असाल तर आसनसोल येथे तुम्हांला बंद करण्यासाठी आमच्याकडे पिंजरा आहे. तुमच्यासारख्या माकडांना पिंजऱ्यात बंद करण्याची आमच्याकडे क्षमता आहे.