तीस हजारी प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द - तीस हजारी प्रकरण अपडेट
दिल्ली उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द केली आहे. तर, एका पोलिसाने साकेत कोर्ट प्रकरणातील वकीलांवर एफआयआर दाखल करण्यासाठी केलेली याचिकाही रद्द करण्यात आली आहे.
Tis Hazari Violence
नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने तीस हजारी प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागणारी याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखल केली होती. त्यावर सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाची स्पष्टीकरण मागणारी याचिका रद्द केली आहे. तर, एका पोलिसाने साकेत कोर्ट प्रकरणातील वकीलांवर एफआयआर दाखल करण्यासाठी केलेली याचिकाही रद्द करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण..?
२ नोव्हेंबरला म्हणजेच मागील आठवड्यात शनिवारी एका वकिलाला दिल्ली पोलिसांनी तीस हजारी न्यायालयाच्या कोठडीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. काही वेळातच बाचाबाचीचे रुपांतर हिसांचारात झाले. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या घटनेत अनेक पोलीस आणि वकिल जखमी झाले. हिंसाचारात पोलीस गाड्या जाळण्यात आल्या. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले.