तिरूमाला - तिरुपतीचे पोलीस अधीक्षक अवुला रमेश रेड्डी यांनी बुधवारी तिरुमला येथील बालाजी मंदिराची पाहणी केली. येत्या ८ जूनपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक देवस्थाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर तिरुमाला तिरुपती देवस्थानाने मंदिर सुरू करण्याची तयारी केली आहे. या तयारीचा आढावा अवुला रेड्डी यांनी घेतला.
गृह मंत्रालयाच्या परवानगीने कोविड-१९ च्या उपाययोजना करून मंदिर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी देवस्थानने सर्व तयारी केली आहे. भाविकांना उभे राहण्यासाठी ठिकाणे निश्चित केली असून मंदिर परिसरात त्यांची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे, असे पोलीस अधिक्षक रेड्डी यांनी सांगितले.