हैदराबाद- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती मंदिर 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. त्यांनतर पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिरुमला मंदिर 14 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद, राम नवमीनिमित्त 50 हजार लोकांना अन्न वाटप - corona news
शुक्रवारी (दि. 3 एप्रिल) मंदिर समितीकडून सुमारे 50 हजार मजूर, रोजंदारी कामगार, गरीब, बेघरांना जेवण वाटप करण्यात येणार आहे. हे जेवण सामाजिक अंतर ठेवत डब्यातून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
मंदिर
गुरूवार (दि. 2 एप्रिल) राम नवमीनिमित्त मंदिरात विधिवत पुजा होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. 3 एप्रिल) मंदिर समितीकडून सुमारे 50 हजार मजूर, रोजंदारी कामगार, गरीब, बेघरांना जेवण वाटप करण्यात येणार आहे. हे जेवण सामाजिक अंतर ठेवत डब्यातून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
हेही वाचा -रामोजी समूहाकडून कोरोनाच्या लढ्यासाठी २० कोटींची मदत