महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टिकटॉकचा विळखा; २ मुलांसह विवाहिता गायब - tiktok fad latest news kurnul

रवी कर्नाटकातील आहेत. तसेच त्यांना २ अपत्येदेखील आहेत. तिचे पती चालक असल्यामुळे आठवड्यातून 2-3 दिवस घरी येत असे. काही महिन्यांपूर्वी अर्चना तिच्या घरी अदोनी येथे आली. तिथे अंजलीही तिच्या सोबत होती. अर्चनाच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले, तिच्या पतीच्या गैरहजेरीवेळी अंजली अर्चनाजवळ येत असे, इतर नातेवाईकांनी देखील तीच माहिती दिली. मात्र तिच्या मैत्रिणीची वेशभूषा देखील वेगळी होती. ती नेहमी मुलांप्रमाणे शर्ट आणि पँट घालत असल्याची माहिती त्यांनी सांगितली.

Tiktok Friendship; women dispeared with her 2 childerens in kurnul
टिकटॉकचा विळखा; २ मुलांसह विवाहिता गायब

By

Published : Dec 14, 2019, 11:30 AM IST

विजयवाडा - टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. अर्चना असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. ही घटना कुर्नूल येथे घडली.

अर्चना (रा. अदोनी, किलीचीनापेटा) या महिलेची अंजली नावाच्या महिलेशी टिकटॉकद्वारे ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यानंतर त्यांची मैत्री एका घरातून दुसऱ्या घरात जाईपर्यंत त्यांची मैत्री टिकली. अर्चना विवाहित आहे. तिचे रवी नावाच्या व्यक्तीसोबत 13 वर्षांपूर्वी लग्न झाले. रवी कर्नाटकातील आहेत. तसेच त्यांना २ अपत्येदेखील आहेत. तिचे पती चालक असल्यामुळे आठवड्यातून 2-3 दिवस घरी येत असे. काही महिन्यांपूर्वी अर्चना तिच्या घरी अदोनी येथे आली. तिथे अंजलीही तिच्या सोबत होती. अर्चनाच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले, तिच्या पतीच्या गैरहजेरीवेळी अंजली अर्चनाजवळ येत असे, इतर नातेवाईकांनी देखील तीच माहिती दिली. मात्र तिच्या मैत्रिणीची वेशभूषा देखील वेगळी होती. ती नेहमी मुलांप्रमाणे शर्ट आणि पँट घालत असल्याची माहिती त्यांनी सांगितली.

हेही वाचा -आसामनंतर आता दिल्लीतही 'कॅब' विरोधी आंदोलन पेटले; जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

या सर्व प्रकारामुळे चार दिवसांपूर्वी अर्चनाच्या परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली. ते म्हणाले, अर्चना आपल्या २ मुलांसोबत गायब झाली. अंजलीने अर्चना आणि तिच्या मुलांचे अपहरण केले आहे, असा आरोप तिच्या परिवारातील सदस्यांनी केला. तर अर्चना आणि तिच्या मुलाचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details