भोपाळ- सोशल मीडियावर कोरोनाबाबत अनेक जोक करणार लोक आहेत. मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगला सहज घेणे मध्य प्रदेशातील सागर येथील तरुणाला महागात पडले आहे. टीकटॉकवर व्हिडिओ बनवून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची मजाक उडवणाऱ्या तरुणालाच कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे.
टिक-टॉकवर मास्क घालण्याची टिंगल उडवणाऱ्या तरुणालाच कोरोनाची लागण - मध्य प्रदेश कोरोना बातमी
टीकटॉकवर व्हिडिओ बनवून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची मजाक उडवणाऱ्या तरुणालाच कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण परिसर सॅनेटाईज करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या सागर येथे कोव्हिड-१९ची पहिली केस समोर आली आहे. याठिकाणी २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण परिसर सॅनेटाईज करण्यात आला आहे. तरुणाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तरुणाने रुग्णालयातून व्हिडिओ बनवून टिक-टॉकवर टाकला आहे. या व्हिडिओत तरुण कोरोनाची लागण झाल्याचे सांगत मास्क घालण्याची लोकांना विनंती करत आहे. याबरोबरच त्याचा जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याने मित्राने घातलेल्या मास्कची मजाक उडवलेली आहे.