महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coronavirus : तिहार तुरुंगात मास्कची निर्मिती, कैद्यांनी बनवले 75 हजार मास्क - Tihar jail inmates made 75000 mask

कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी कारागृहातील कैदीही भाग घेत आहेत. दिल्लीच्या तिहार आणि मंडोली जेलमधील कैद्यांनी 75 हजार मास्क तयार केले आहेत. तसेच येथे सॅनिटायझरही बनवण्याचे काम सुरू आहे.

Tihar jail
तिहार तुरुंगात मास्कची निर्मिती

By

Published : Apr 6, 2020, 12:47 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांसह इतर विभाग गुंतलेले आहेत. त्याचबरोबर तुरूंगातील कैदीही या लढाईत आपला सहभाग नोंदवत आहेत. तिहार आणि मंडोलीच्या तुरूंगातील कैद्यांनी 75 हजार मास्क तयार केले आहेत. याबरोबरच कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, तुरुंगात इतर ठिकाणी सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरू आहे.

कैद्यांनी बनवले 75 हजार मास्क
  • कारागृहात मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती -

तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल म्हणाले की, तुरूंगात 750 लीटर सॅनिटायझर बनवण्यात आले आहे. तिहार आणि मंडोली तुरूंगात मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. तर रोहिणी तुरूंगात हे मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क तुरूंगातील कैद्यांसाठी बनवण्यात येत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

  • पोलीस आणि इतर विभागांना पुरवले जात आहेत मास्क -

गरज भासल्यास तरुंगातील कैद्यांसह इतर विभागांनाही मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा केला जाईल. दिल्ली वाहतूक पोलीसां व्यतिरिक्त इतर विभागांना गेल्या आठवड्यात मास्कचा पुरवठा करण्यात आला होता. या तुरूंगात मार्चपासून मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. तर आतापर्यंत 75 हजार मास्क बनवून तयार झाले आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

तरुंगात दररोज सुमारे 1500 ते 2000 मास्क तयार केले जात आहेत. ब्रँडेड कंपन्यांच्या मास्कपेक्षा या मास्कची गुणवत्ता अधिक चांगली असल्याचे महासंचालक गोयल यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details