महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया हत्याकांड : गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी तिहार प्रशासनाची तयारी, उत्तरप्रदेशमधून मागवले जल्लाद

निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्याची तयारी दिल्लीतील तिहार तुरुंगाने सुरू केली आहे. अद्याप राष्ट्रपतींकडून गुन्हेगारांच्या दया याचिकेवर निर्णय आलेला नाही. त्यापूर्वीच प्रशासन फाशी देण्याच्या तयारीला लागले आहे.

jallad
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Dec 12, 2019, 5:31 PM IST

नवी दिल्ली -निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्याची तयारी दिल्लीतील तिहार तुरुंगाने सुरू केली आहे. अद्याप राष्ट्रपतींकडून गुन्हेगारांच्या दया याचिकेवर निर्णय आलेला नाही. त्यापूर्वीच प्रशासन फाशी देण्याच्या तयारीला लागले आहे. मात्र, तिहार तुरुंगामध्ये फाशी देण्यासाठी एकही जल्लाद उपलब्ध नाही. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने उत्तरप्रदेशच्या तुरुंग महासंचालकांकडे दोन जल्लाद देण्यात यावेत, अशी मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा -हैदराबाद चकमक: सहा महिन्यांत अहवाल द्या, तीन सदस्यीय चौकशी समीतीची सर्वोच्च न्यायालयानं केली स्थापना

दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये निर्भया हत्याकांडातील चारही आरोपींना ठेवले आहे. यातील एक आरोपी मंडोली तुरंगामध्ये होता. मात्र, तेथे फाशी देण्याची सुविधा नसल्याने त्यालाही तिहार तुरुंगात आणण्यात आले आहे. आता चौघांनाही फाशी देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. याच महिन्यात सर्वांना फाशी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

उत्तरप्रदेश महासंचालकांकडे जल्लादांची मागणी -
तिहार तुरुंग प्रशासनाने फाशी देण्यासाठी दोन जल्लादांची मागणी उत्तरप्रदेशच्या तुरुंग महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. तिहार तुरुंगामध्ये लवकरच काही आरोपींना फाशी दिली जाणार आहे, त्यासाठी जल्लादांची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे. तिहार तुरुंगामध्ये सध्या एकही जल्लाद नाही. तिहार तुरुंगाच्या मागणीनुसार दोन जल्लाद देण्याचा निर्णय उत्तरप्रदेश पोलिसांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा -'भाजपकडून संविधानाच्या मुळ गाभ्यावर हल्ला'

दया याचिकेवर लवकरच होणार निर्णय -

निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. त्यावर लवकरच निर्णय येऊ शकतो. दया याचिकेवर निर्णय आल्यानंतर आरोपींना लवकरच फाशी होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details