महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : आरोपींच्या फाशीसाठी नवी तारीख जाहीर करा; तिहार तुरूंग प्रशासनाची मागणी

तिहार तुरूंग प्रशासनाने शिक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र, दिल्ली सरकारला लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश सिंह याने दाखले केलेल्या दया याचिकेचे कारण पुढे करत, ही मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.

Tihad jail administration wrote a letter asking for a new date of hanging from the Delhi government
निर्भया प्रकरण : आरोपींच्या फाशीसाठी नवी तारीख जाहीर करा; तिहार तुरूंग प्रशासनाची मागणी

By

Published : Jan 16, 2020, 6:33 PM IST

नवी दिल्ली- निर्भया प्रकरणातील आरोपींना होणारी फाशीची शिक्षा २२ जानेवारी ऐवजी पुढे ढकलली जाण्याची शक्यता दिसत आहे. तिहार तुरूंग प्रशासनाने शिक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र, दिल्ली सरकारला लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींच्या फाशीसाठी नवी तारीख जाहीर करा; तिहार तुरूंग प्रशासनाची मागणी

या आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश सिंह याने दाखले केलेल्या दया याचिकेचे कारण पुढे करत, ही मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर आरोपी मुकेश सिंहने दाखल केलेल्या दयेच्या अर्जामुळे ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुकेश याची दया याचिका आज दिल्ली सरकारने फेटाळून लावली. त्यानंतर, दिल्ली न्यायालयाने या आरोपींच्या फाशीसंदर्भातील तयारीचा अहवाल १७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश तिहार तुरूंग प्रशासनाला दिले होते.

मात्र, आता तुरूंग प्रशासनानेच तारीख बदलण्याची मागणी करणारे पत्र सरकारला लिहिल्यामुळे, नक्की कोणत्या दिवशी या आरोपींना फाशी होईल हे अजूनही नक्की सांगता येणार नाही.

हेही वाचा : 'राज्यपालांना डावलून सर्वोच्च न्यायालयात जाणं म्हणजे नियमांचे उल्लंघन'

ABOUT THE AUTHOR

...view details