महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत व्याघ्र प्रकल्पात ट्रान्क्विलाईझर्सच्या ओव्हरडोसमुळे वाघाचा मृत्यू - गुंगीच्या अतिवापरामुळे वाघाचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या पीलीभीत व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडून जवळच्या जरी गावातील नागरिकांवर हल्ला केलेल्या वाघाला बेशुद्ध करून परत जंगलात सोडण्यासाठी रेस्क्यू टीमने सापळा रचला. वाघ दिसताच त्याला ट्रान्क्विलाईझ करण्यासाठी गुंगीच्या औषधांचे डॉर्टस मारण्यात आले. मात्र, वाघ बेशुद्ध झाल्याच्या १५ मिनीटानंतरच त्याचा मृत्यू झाला. यावर वाघाचा मृत्यू हा गुंगीच्या औषधींच्या अतिवापरामुळे झाल्याचा आरोप काही वन्यजीव कार्यकर्त्यांनी केला आहे.

प्रकल्पात ट्रान्क्विलाईझर्सच्या ओव्हरडोसमुळे वाघाचा मृत्यू
प्रकल्पात ट्रान्क्विलाईझर्सच्या ओव्हरडोसमुळे वाघाचा मृत्यू

By

Published : May 4, 2020, 2:35 PM IST

पिलीभीत - उत्तर प्रदेशच्या पीलीभीत व्याघ्र प्रकल्पात (पीटीआर) रविवारी सायंकाळी एका पच वर्षीय वाघाला ट्रान्क्विलाइझ केल्याच्या १५ मिनीटानंतरच त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना प्रकल्पाजवळ असलेल्या जरि या गावामध्ये घडली. माहितीनुसार या वाघाने गेल्या एका आठवड्यात ५ जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले होते. यानंतर, त्याला गुंगीच्या औषधांचे (ट्रान्क्विलाईझर्स) डॉर्टस देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. मात्र, यात त्याचा मृत्यू झाल्याने आता गुढ निर्माण झाले आहे.

याबाबत येथील वनअधिकाऱ्यांनी वाघाचा मृत्यू हा त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांमुळे झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे वाघाचा मृत्यू हा ट्रान्क्विलाईझर्सच्या अति प्रमाणामुळे झाला असल्याचा संशय काही वन्यजीव कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी हा वाघ पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून (पीटीआर) बाहेर पडला होता आणि त्याचदिवशी सकाळच्या सुमारास गजरौला पोलीस सर्कल अंतर्गत जरि गावातील तीघांवर हल्ला केला. त्यानंतर, त्याला परत आणण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरही त्याने हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यामुळे जरिच्या गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली. परिणामी शेतीची आणि इतर सर्व कामे बंद पडली. तर, वनविभागाच्या एका पथकाने जरि परिसरात कॅमेरे लावून आणि सापळे लाऊन वाघाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली.

दरम्यान, रविवारी डॉक्टर एस.के. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम जरि गावात दाखल झाली. वाघाला बेशुद्ध करून त्याला परत जंगलात सोडण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. दरम्यान वाघाचे लोकेशन कळले, पथकाने त्यानुसार तयारी करून बंदुकीच्या सहाय्याने इंजेक्शनद्वारे त्याला बेशुद्ध(ट्रान्क्विलाईझ) केले. मात्र, ट्रान्क्विलाईझ करण्याच्या १५ मिनीटानंतरच या वाघाचा मृ्त्यू झाला. याबाबत स्पष्टीकरण देताना, वाघाला वैद्यकीय निरीक्षणाखालीच बेशुद्ध करण्यात आले होते. मात्र, वाघाच्या श्वासनलिकेमध्ये तीन जखम होत्या आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असल्याचे पीटीआरचे उपसंचालक नवीन खंडेलवाल म्हणाले.

मात्र, लखनौमधील वन्यजीव कार्यकर्ते कौशलेंद्र सिंह यांनी ते फेटाळून लावले असून वाघाचा मृत्यू हा त्याला बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रान्क्विलाईझर्सच्या अतिवापरामुळे झाला असल्याचा दावा केला आहे. वाघाला बेशुद्ध करताना उपस्थित असलेल्या वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाघाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रान्क्विलाईझर्सचे एकापाठोपाठ एक असे ४ डार्टस मारले गेले होते. परिणामी त्याचा ओव्हरडोस झाल्याने वाघाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. तर, बरेली झोनचे मुख्य संरक्षक ललित वर्मा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत केवळ दोन डार्ट्सचा वापर केला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details