श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथून लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पोलीस व 28-राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी अटक केली आहे. हे तिन्ही दहशतवादी नुकतेच लष्कर-ए-तोयबाशी जोडले गेल्याची माहिती आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक - terrorists of lashkar e tayyiba arrested
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथून लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पोलीस व 28-राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी अटक केली आहे.
झाकीर अहमद भट आणि आबिद हुसेन वानी असे त्यातील दोघांची नावे आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटली नाही. काश्मीरमध्ये पोलीस व 28-राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी संयुक्त मोहीम राबवली होती. मोहिमेदरम्यान या तिघांना पकडण्यात आले आहे.
आजच्या दहशतवादविरोधी दिनी लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे. भारतामध्ये दरवर्षी 21 मे हा दहशतवादविरोधी दिवस पाळला जातो. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर व्ही.पी. सिंह सरकारने 21 मे हा दिवस भारतामध्ये दहशतवादविरोधी दिन म्हणून घोषित केला.