जम्मू-काश्मीर - पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. झदूरा भागात झालेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक जवान जखमी झाला आहे. परिसरात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा - पुलवामा एनकाऊंटर
पुलवामा जिल्ह्यातील झदूरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, चकमकीत जखमी झालेला जवान शहीद झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात चकमक
सुरक्षा दलाला दहशतवाद्यांची ठिकाणे माहित झाल्यानंतर त्यांनी झदूरा भागात शोधमोहीम सुरू केली. अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्याने चकमक सुरू झाली. या चकमकीत जखमी झालेल्या जवानाला श्रीनगरला उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी शोपियां जिल्ह्याच्या किलुरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Last Updated : Aug 29, 2020, 8:39 AM IST