जम्मू काश्मीर - पुलवामामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरामध्ये ही कारवाई केली.
काश्मीर : पुलवामामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान - जम्मू काश्मीर बातमी
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. अन्सार-गझवा-उल-हिंद या संघटेने तिन्ही दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.

या तिघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यातील जहांगिर हा दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कमांडर होता, तसेच आठ मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. २०२० या वर्षात सुरक्षा दलांनी १० दहशतवाद विरोधी कारवाया केल्या. यातील ८ काश्मीर भागात तर २ जम्मूमध्ये करण्यात आल्या. यामध्ये काश्मीरात १९ तर जम्मूत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी माहिती दिली.
जांगिर रफिक, राजा उमर मकबूल भट आणि उझैर अमिन भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. काश्मीर पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.